Massage

'EduCulture' या शैक्षणिक संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे.....

❬❬ ब्लॉग आवडला तर Like करायला विसरू नका ❭❭



कल चाचणी 

                    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येईल.या माध्यमातून त्यांना उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करुन आवश्यकतेनुसार वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येईल.
  • सन २०१५-१६ पासून सुरु करण्यात आलेल्या कल चाचणीकरिता वेबसाईट सुरु झालेली आहे 
  • त्यासाठी प्रत्येक शाळेतील सर्व संगणकांचे ऑनलाईन सर्वेक्षण दिनांक ९ डिसेंबर,२०१५ ते २३ डिसेंबर,२०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे.
  • प्रत्येक शाळेत हे सर्वेक्षण व कलचाचणीची जबाबदारी एका शिक्षकावर सोपविली आहे, त्या शिक्षकाने माहिती भरावी.

    उद्देश :१)इयत्ता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला व्यवसाय मार्गदर्शन सेवेद्वारे शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मार्गदर्शन करणे.  २) विद्यार्थी व पालक यांना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची माहिती देऊन जाणीव जागृती करणे.



    -: सर्वेक्षण माहिती भरण्यासाठी सूचना :-
    १)
     शाळांनी http://mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर  REGISTER  करावे .
    २)
    REGISTRATION केल्या नंतर TEACHER lOGIN करता येईल .
    ३)
     Teacher login मध्ये तुम्हाला Inspection Tool download साठी मिळेल.
    ४)
     Inspection Tool हे -    असे आहे.
    ५)
     या Icon वर right click करून  ‘ Run As Administrator ‘ करावे.
    ६)
     Inspection Tool Run करण्यासाठी तुमच्या संगणकावर –
    Dot Net Framework 2.0 आणि
    Internet Connectivity आवश्यक आहे.
    ७)
     Inspection Tool हे शाळेतील प्रत्येक संगणकावर Execute करणे आवश्यक आहे.
    ८) जर मशिन thin client  किंवा N computing असेल तर inspection tool Server मशिन वर Execute करावे.


कल चाचणी: कशासाठी?
  • कल चाचणी मुळात विद्यार्थ्यांच्या मनाचा वेध घेण्यासाठी, त्याची आवड किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये लपलेले सुप्त गुण शोधण्यासाठी आहे. त्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी आहे याची चाचणी यामध्ये होणार नाही .
  • म्हणून विद्यार्थ्यांनी विचार करून उत्तरे देण्या ऐवजी मनाचा आवाज ऐकून उत्तरे दिल्यास ही चाचणी जास्त फलदायी ठरणार आहे.
  • कल चाचणी ही एक मानसशास्त्रीय चाचणी असून त्या द्वारे विद्यार्थ्यांना १०वी नंतर कोणत्या क्षेत्रात गेल्यास चांगले यश मिळू शकते, याचा अंदाज येणार आहे.
  • विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणाबाबत कल विचारात घेऊन त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार वेळीच शैक्षणिक क्षेत्र निवडीस मदत केल्यास त्यांच्या उपजत कलागुणांना वाव मिळतो.
  • या चाचणीत एकूण १५२ प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखता येणार आहे आणि त्यांच्या प्रगतीचा योग्य मार्ग त्यांना सापडणार आहे.
  • अर्थात, हे सर्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा विद्यार्थी विचार करून आदर्श उत्तरे देण्या ऐवजी खरी उत्तरे देतील.
  • म्हणून आपल्या सारख्या सर्व शिक्षकांचे कर्तव्य आहे की या चाचणीचे खरे स्वरूप विद्यार्थ्यासमोर आणून त्यांच्या मनातील कल चाचणीची भीती काढून टाकणे, जेणेकरून ते मोकळ्या मानाने ही चाचणी देतील.
कल चाचणी Online / Offline 
  • कल चाचणी २०१६ ही चाचणी online तसेच offline अश्या दोन्ही स्वरुपात घेता येणार आहे.
  • साहित्यासोबत एक CD मिळणार आहे त्यात १) winrar, 2)dot net framework 2.0 आणि ३) Exam Client असे तीन applicaation मिळणार आहेत.
  • दिलेल्या क्रमाने ते परीक्षा घ्यावयाच्या संगणकावर install करावयाची आहेत.
  • त्यानंतर Exam Client open करून विद्यार्थ्याच्या बैठक क्रमांकाने login करावयाचे आहे.
  • Login करते वेळीच भाषा निवडायची आहे, एकदा भाषा निवडल्यावर पुन्हा भाषा बदलता येणार नाही.
  • एका page वर 5 प्रश्न असणार आहेत, पाचही प्रश्न सोडविल्याशिवाय पुढच्या page वर जाता येणार नाही.
  • जोपर्यंत त्या page वर आहे तोपर्यंत विद्यार्थ्याला आपली उत्तरे बदलता येणार आहेत, परंतु एकदा page submit केल्यानंतर परत मागे येत येणार नाही.
  • सर्व प्रश्न अनिवार्य आहेत.
  • शेवटचे page submit केल्यानंतर give up या बटनावर क्लिक करावयाचे आहे, येथे विद्यार्थ्याची चाचणी पूर्ण झाली.
  • give up केल्यानंतर seat no.ans (उदा. K001234.ans ) या नावाची उत्तराची फाईल तयार होते.
  • अशा files dextop वर 'कल चाचणी २०१६' या अपोआप तयार झालेल्या फोल्डर मध्ये save होणार आहेत.
  • सर्व विद्यार्थ्याची चाचणी घेऊन झाल्यानंतर संकेतस्थळावर teacher login वरून manual download करणे.
  • त्या manual मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कृती करून सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तराच्या फाईल upload करणे.
  • Upload successfully असा संदेश येईपर्यंत वाट बघणे, असा संदेश आल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे. येथे चाचणी प्रक्रिया संपली.
  • दुसऱ्या दिवशी teacher login वर प्रमाणपत्र प्राप्त होईल. ते प्रमाणपत्र आणि विद्यार्थ्यांचा उपस्थिती अहवाल मंडळात submit करावयाचा आहे. येथे शिक्षकाचे चाचणीचे काम संपले.
  • महत्वाची सूचना: online तसेच offline दोन्ही पद्धतीत सारखीच कृती करावयची आहे, परंतु online चाचणी घेते वेळी उत्तर फाईल आपल्या dextop वर तसेच मंडळाच्या सर्वर वर दोन्ही ठिकाणी save होणार आहे आणि offline चाचणी घेते वेळी उत्तर फाईल आपल्या dextop वरच save होणार आहेत, म्हणून offline चाचणी घेते वेळी प्रत्येक विद्यार्थ्याची चाचणी संपल्यावर उत्तर फाईल आपल्या pane drive वर save करून घेणे जेणेकरून संगणकात काही बिघाड झाला तरी चाचणी प्रक्रिया पूर्ण कताना काही अडचण येणार नाही.
 
सूचना, पत्रके आणि इतर     
  • परीक्षेचा कालावधी 40 मिनिटे असेल, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला हा कालावधी कमी पडला आणि काही प्रश्न राहून गेले तर वेळ वाढवून देण्याचा अधिकार आपणाला असेल.
  • कोणत्याही परस्थितीत विद्यार्थ्याने पूर्ण प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत.
  • ठरलेल्या वेळेत विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास नंतरच्या कोणत्याही batch मध्ये त्याला प्रवेश देता येईल.
  • चाचणी घेते वेळी विद्यार्थ्याची उपस्थिती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा तक्ता download करण्यासाठी येथे क्लिक करा.

0 comments:

 
Top